I love helping people, that’s why I took nursing : Sonali

I love helping people, that’s why I took nursing : Sonali

Sonali Jarande, a very simple and straightforward girl entered the interview room with a soft voice. She patiently stood until asked to sit. Her simple nature was noticeable. She began sharing her story. She has a profound respect for her parents. Her father has two and a half acres of farmland and her mother works as a farm labourer. The milk-produce from their three cows goes to the dairy. They have a two-room house, a tractor, a cowshed, and farmland in their village.

We asked her some academic questions and realised that Sonali, although of average intelligence, she is a very hardworking girl. Further discussion revealed that her uncle and aunt are her guides for her career. The family of seven lives together. Her maternal uncle (Mama) provides a great support to the family.  Sonali is very determined. When asked why she chose nursing, she said she loves helping people, which shows her dedication. She has painstakingly saved ten thousand rupees for her second-year fees. Given her background and determination, I truly believe Sonali deserves this Fellowship.

 

 

 

 

 

 

 

आई मला खेळू देत नाही – यशचा शिकण्याचा आणि जगण्याचा संघर्ष

आई मला खेळू देत नाही – यशचा शिकण्याचा आणि जगण्याचा संघर्ष

अत्यंत कृश शरीरयष्टी असलेला यश त्याच्या आईबरोबर आला होता. अंगाने अशक्त असला तरीही चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास! त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांना तत्परतेने उत्तर देण्याची इच्छाशक्ती स्पष्ट जाणवत होती आणि म्हणूनच मुलाखतीची सुरुवात त्याच्यापासूनच केली. यश विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत होता. ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे तो शाळेत नियमितपणे हजर राहू शकत नव्हता. अशा परिस्थितीतही त्याच्या अद्ययावत ज्ञानाची आम्हाला कमालच वाटली! विज्ञान त्याचा सगळ्यांत आवडीचा विषय. त्याने नामवंत शास्त्रज्ञांची माहिती तर सांगितलीच पण विचारलेल्या इतर प्रश्नांचीसुद्धा अचूक उत्तरे दिली. गणिताबद्दलही त्याला विशेष आकर्षण असल्याचे जाणवते. गणितातील तर त्याचे विशेष आवडीचे पाढे, अधून-मधून विचारले असता त्याने अगदी अचूक सांगितले. इतर विषय देखील यशला आवडत असल्याचे त्याने सांगितले.त्याला मैदानाचे विशेष आकर्षण असल्याचे लक्षात आले. तो खेळाबद्दल बोलायला खूप उत्सुक होता. खेळाबद्दलची थोडी माहिती दिल्यानंतर त्याने, “आई मला खेळायला सोडत नाही. तुम्ही आईला सांगा ना” अशी आईबद्दल तक्रार केली.आईकडे प्रश्नार्थक नजरेने आम्ही पाहिले आणि आईची मुलाखत घेण्यास सुरुवात केली. पण आम्ही प्रश्न करण्याआधीच “यशला खेळायला पाठवण्यास माझा सक्त विरोध आहे”, असे त्या ठामपणे म्हणाल्या. आईने माहिती देण्यास सुरुवात केली. यशचे वडील एका बांधकाम उद्योजकाकडे कामाला आहेत व त्याची आई एका खासगी रुग्णालयात नर्सिंगचे काम करते. यशला दोन लहान भावंडे आहेत. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचे सहा जणांचे कुटुंब राहते. काही क्षण थांबून त्यांनी यशला बाहेर पाठवून दिले आणि मग त्या बोलण्याची मनोमन तयारी करू लागल्या.इतका वेळ यशच्या यशाने भरून गेलेले वातावरण एकदमच गंभीर झाले! क्षणभर शांतता पसरली. त्याच्या आईने सांगितले की त्याला हृदयाचा एक गंभीर आजार आहे. खूप औषधोपचार करूनही त्याला यश आले नाही. त्याच्या उपचारासाठी महिन्याला सहा ते आठ हजार रुपयांचा खर्च होतो आणि तो यातून पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे.  यशला या आजाराची काहीच कल्पना नाही नसल्याने तो लाडीकपणे आईची तक्रार आमच्याकडे करत होता. अशा गुणी यशला त्याच्या उरलेल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ही फेलोशिप देण्यास काहीच हरकत नाही.
Ajay’s Story

Ajay’s Story

Here are some stories you can read, which  will give you an insight as to why some students get selected or their applications are forwarded to the Management of PPCF.

अजय च्या अर्जावरची मुख्याध्यापकांची शिफारस वाचली – ‘अजय अतिशय शांत, प्रामाणिक आणि हुशार मुलगा आहे .चित्रकलेची विशेष आवड आहे. आणि  तो खूप छान चित्र काढतो.’

अजय मुलाखतीच्या खोलीत आला आणि त्याला बसता क्षणी त्याच्या चित्रकलेबद्दलच प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे त्याची एकदमच कळी खुलली आणि तो भरभरून बोलू लागला. त्याच्या आवडीच्या विषयाबद्दल बोलताना कुठेही बुजरेपणा जाणवलाच नाही. पुढे जाऊन त्याने त्याच्या मोबाईलवर, त्याने काढलेल्या चित्रांचे फोटो आम्हाला दाखवले. आम्ही त्याची ही कला बघून अवाकच झालो !त्याच्यात ठासून भरलेल्या क्रिएटिविटीची ती एक झलकच होती.

त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा मनसुबा देखील त्याने बोलून दाखवला. त्याचा शालेय अभ्यास सुद्धा खूपच चांगला आहे. विचारलेल्या सर्व प्रश्नांची तंतोतंत उत्तरे त्यांनी पटकन दिली. त्याच्या पालकांविषयी बोलताना त्याचा निरागस चेहरा बरंच काही सांगून गेला. त्याचे वडील बिगारी कामगार म्हणून काम करतात व आई लोकांकडे घर काम करते. करोना च्या काळामुळे आईची कामे कमी झाली. अत्यंत अल्प कमाईत हे कुटुंब कसे तरी आपले जीवन जगत आहेत. इतक्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असून देखील अजयने आपले मन शांत ठेवून आपली चित्रकला विकसित करण्याचे ठरवले.

ऑनलाईन शाळा सुद्धा त्याने 100% हजर राहून पूर्ण केली. त्याच्यातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले आहे परंतु त्याचे कुठलेही कर्ज या कुटुंबावर नाही. त्यांच्या राहत्या घराबद्दल चौकशी केली असता असे समजले की ते एका छोट्याशा सिंगल खोलीमध्ये राहतात. ते देखील भाडेतत्त्वावरया खोलीला स्वतंत्र शौचालये नसल्यामुळे सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. त्याच्या वडिलांना प्रश्न विचारले असता अजयच्या इच्छेनुसार त्याला इंजिनिअरिंगसाठी साथ देण्याची त्यांची खूप इच्छा आहे.

अशा या अत्यंत शांत, प्रामाणिक आणि हुशार मुलाला ही फेलोशिप  मिळावी अशी शिफारस करत आहोत.

Rohan – wants to serve the Nation

Rohan – wants to serve the Nation

रोहनचा अर्ज समोर आला आणि त्याचा तपशील वाचायला मी सुरुवात केली. क्रमांक दोनचा मुद्दा

अभ्यासाव्यतिरिक्त इतर कला गुण

सहावी, सातवी,आठवीडॉजबाल मध्ये प्रथम क्रमांक, कराटेची आवड ,कबड्डीची प्रचंड आवड, अभिनयामध्ये पुरस्कार ! वाचून असं वाटलं की रोहनच्या अर्जाचे केवळ रकाने भरलेत असं नाही तर त्याचं संपूर्ण जीवनच खेळामुळे परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय.

अर्जातील पहिला रकाना वार्षिक परीक्षेतील गुण–  शास्त्र आणि गणितामध्ये 93% ! अर्ज वाचताच रोहनची छबी मनात रेखाटली गेली आणि अगदी तंतोतंत तसाच रोहन समोर उभा राहिला! अतिशय उंच, देहयष्टी व्यायामामुळे आणि खेळामुळे एकदम fit !

रोहन आई बरोबर आला होता. मुलाखतीची सुरुवात रोहन पासूनच केली. अतिशय आत्मविश्वासाने तो उत्तरे देऊ लागलापुढे त्याने त्याच्या करियर बद्दलच्या संकल्पना स्पष्ट आमच्या समोर मांडल्या.

त्याला  Navy मध्ये जायचे आहे. त्याच्या साठी लागणारी सगळी माहिती त्याने यथावकाश सांगितली. नुसती सांगितली असे नाही तर त्याप्रमाणे त्याची तयारी देखील करत आहे  हे जाणवले. अभ्यासाची आणि शारीरिक फिटनेस ची तयारी नित्य नियमाने करत आहे असे त्याने सांगितले आहे तर ते पडताळून पाहण्यासाठी तू जोर मारतोस का असे विचारताच, त्याने पटकन खुर्ची बाजूला सरकवून सलग वीस जोर मारून दाखवले! त्याच्या या झटपट कृतीमुळे वेगळीच छाप पडून गेली आणि त्याची ध्येय सक्ती सुस्पष्टपणे दिसली. अभ्यासातली गती सुद्धा ठळकपणे जाणवत होती. रोहन ज्या वस्ती मध्ये राहतो त्याचा कुठलाही विपरीत परिणाम त्याच्या विचारांवर झाला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.   म्हणजेच  त्याची जिद्द आणि त्याचे लक्ष्य याचे कौतुक करावे तेवढे थोडेच !

रोहनच्या आईशी आता बोलायला सुरुवात केली, त्यांच्याकडून असे समजले की त्याचे वडील व्यसनामुळे सहा वर्षांपूर्वीच निवर्तले. त्याची आई घरकाम करून रोहनचे संगोपन करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. रोहनची आजी व मामा अडीअडचणीला मदत करत असतात. अशा या अत्यंत हुशार, जिद्दी आणि जबाबदारीची जाणीव असलेल्या रोहनला फेलोशिप मंजूर करून त्याच्या भावी आयुष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी नक्कीच हातभार लावायला हरकत नाही.

Kedar – a magician turning trash into art

Kedar – a magician turning trash into art

We arrived at the school and immediately noticed the students’ rush for interviews. Kedar stood out with his appealing personality. During the interview, Kedar mentioned that he came with his aunt. His aunt looked frail but gentle. Both Kedar and his aunt showed remarkable simplicity and humility.

Kedar started sharing his story. We learned that he has lived with his aunt since childhood, while his parents work as farm labourers in Karnataka. He has a passion for art, particularly recycling the waste in the form of art. His grandfather hopes that he’ll become a high-ranking officer. It is the goal Kedar also strives for. He is intelligent and he has an ability to discuss any topic deeply, as we observed during the interview.

Kedar’s aunt then explained that she raises five girls and Kedar in a three-room house, with her husband being the sole earner. Kedar’s aunt is a cancer patient, but she manages the household with great care. Despite her health issues, her love for Kedar and her desire to support his education brought her to the interview.

When they sat next to each other, it felt like a mother and son were sitting together. Such was the affection between them. It was evident during our conversation that Kedar’s aunt genuinely wished for him to achieve brilliant success in the field of art. I truly admire the ambition shared by Kedar and his aunt. Considering his entire economic and educational background, I firmly believe that he certainly deserves this fellowship.